राजूर ग्रामीण रुग्णालयमार्फत सर्वोदय विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांना लसीकरणास सुरुवात
राजूर: देशातील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी सोमवारपासून लसीकरण मोहीम सुरु झाली. आज दिनांक ५ जानेवारी बुधवारी गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात कोह्क्स्जीन लसीची पहिला डोस देण्यास सुरुवात करण्यात आली.
शासनाच्या आदेशानुसार व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात १५ ते १८ विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. दिघे व वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एस. बांगर , अधिपरिचारिका प्राजक्ता पाटोळे, ऑपरेटर एच.एस. साबळे यांनी लसीकरण मोहीमेस सुरुवात केली. यावेळी प्राचार्य एम.डी. लेंडे, उप प्राचार्य एस.एस. पाबळकर, जेष्ठ शिक्षक बी. एस. ताजणे, सर्व शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. यावेळी व्ही. टी. तारू, ए.डी. गुंजाळ, ए.डी. तळेकर, आहेर सर यांनी लसीकरणास मोलाचे सहकार्य केले.
Web Title: Vaccination of students of Sarvodaya Vidya Mandir Rajur begins