गारपीटग्रस्तांना १०० टक्के नुकसान भरपाई! राधाकृष्ण विखेंचं आश्वासन
Ahmedngar | Parner News: गारपिठीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल. (Unseasonal Rain)
Radhakrushn Vikhe on Unseasonal Rain: गांजीभोयरे, वडुले, सांगवीसूर्या व पानोली या गावात गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांना शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल. इतरही ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण केले जातील.
विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यात भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. जनावरांसाठी चाराही देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिले.
पालकमंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील गारपीटग्रस्त गावांचा दौरा केला. त्यांनी गांजीभोयरे, सांगवी सूर्या, वडुले व पानोली येथील गारपीटग्रस्त पिकांची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवादही साधला. यात गांजीभोयरे येथील एकनाथ खोडदे, दादाभाऊ खणसे, तर सांगवी सूर्या येथील संदीप कोठावळे आदींच्या कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
जनावरांना पुन्हा चारा होण्यासाठी किमान अडीच महिने लागतील. त्यामुळे गारपीटग्रस्त गावातील शेतकऱ्यांची जनावरे वाचविण्यासाठी चारा डेपो तातडीने सुरू करणार आहे असे आश्वासन विखे पाटील यांनी यावेळी दिले.
Web Title: Unseasonal Rain 100 percent compensation for hail victims Radhakrishna Vikhe
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App