Home अहमदनगर संगमनेर तालुक्यात आढळला अनोळखी मृतदेह

संगमनेर तालुक्यात आढळला अनोळखी मृतदेह

Breaking News | Sangamner: मालदाड येथील वन विभागाच्या शिवारात, अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.

unidentified Dead body was found in Sangamner taluka

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील – मालदाड येथील वन विभागाच्या शिवारात, अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी (दि. २३) रात्री ९ वाजता अंदाजे ५५ ते ६० वर्षीय अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजि. नं. ४६/२४ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे नोंद केली आहे. सदर मयत इसमाच्या अंगावर पिवळ्या रंगाचे हाफ बाही असलेले बनियान व नाडी असलेली अंडरवेअर घातलेली आहे. तसेच उजव्या हाताच्या दंडावर कापडी ताईत बांधलेले आहेत. सदरचा मृतदेह हा कॉटेज हॉस्पिटल संगमनेर येथे ठेवण्यात आला आहे. तरी वरीलप्रमाणे वर्णनानुसार मयताची ओळख पटल्यास संगमनेर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यात मागील आठ दिवसात चौथा मृतदेह सापडला आहे. तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारचे मृतदेह सापडत असल्याने गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीसांच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण होत आहे.

Web Title: unidentified Dead body was found in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here