काकाचा पुतणीवर अत्याचार, आई म्हणे कुणाला सांगू नको
Solapur Crime: बारा वर्षीय पुतणी घरात एकटी असताना काकाने तिला मारहाण केली अन् गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार (Abused) केल्याची धक्कादायक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
सोलापूर: बारा वर्षीय पुतणी घरात एकटी असताना काकाने तिला मारहाण केली अन् गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगूनही आईने ती बाब लपवून ठेवली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काका आणि आईवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुतणी घरात एकटी असल्याची संधी साधून काका तिच्या घरात घुसला. तिला सातत्याने मारहाण करीत त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडितेने आईला सांगितल्यानंतर तिने ही बाब कोणाला सांगू नको. नाही तर आरोपी हा आपल्या दोघांना मारून टाकील’, असे सांगून ही घटना लपवून ठेवली.
Web Title: Uncle abused nephew, mother says don’t tell anyone
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App