Home महाराष्ट्र ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू

ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू

Satara: शेतातील काम आटोपल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून घरी परतत असताना कारंडवाडी येथे कण्हेर उजव्या कालव्यात ट्रॉली कोसळून चार महिलांचा बुडून (Drowned) मृत्यू.

Four women drowned after tractor trolley fell into canal

सातारा:  शेतातील काम आटोपल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून घरी परतत असताना कारंडवाडी येथे कण्हेर उजव्या कालव्यात ट्रॉली कोसळून चार महिलांचा बुडून मृत्यू झाला. तर, पाण्यात बुडालेल्या इतर दोन महिलांना वाचविण्यात यश आले आहेत.

लीलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (५५), अरुणा शंकर साळुंखे (५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (६५, सर्व रा. कारंडवाडी) अशी बुडून मृत्यू झालेल्या महिलांची नावे

शेतातील काम आटोपल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉलीमधून घरी परतत असताना कारंडवाडी येथे कण्हेर उजव्या कालव्यात ट्रॉली कोसळून चार महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पाण्यात बुडालेल्या अन्य दोन महिलांना वाचविण्यात यश आले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात कारंडवाडी गाव आहे. या गावातील सात ते आठ महिला शनिवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी चारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने, सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घराकडे निघाल्या होत्या.

कारंडवाडी-देगाव रस्त्यावरील कॅनॉल शेजारून ट्रॅक्टर येत असताना, वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली कॅनॉलमध्ये कोसळली. त्यामुळे ट्रॉलीतील सहा महिला कॅनॉलमधील पाण्यात पडल्या. यातील चार महिलांचा मृत्यू झाला. तर दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कॅनलमधून बाहेर काढले. परंतु त्या महिलांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. त्यांच्यावर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस व नागरिकांनी चारही महिलांचे मृतदेह कॅनॉलमधून बाहेर काढून, जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. एकाच गावातील चार महिलांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली.

Web Title: Four women drowned after tractor trolley fell into canal

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here