उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, दोन नगरसेवक भाजपात
Political News: आणि नगर परिषदेचे २ नगरसेवक यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र.
धाराशिव: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या पदाधिकारी आणि नेत्यांची संख्या वाढली आहे. धाराशिव येथे युवासेना जिल्हाप्रमुख आणि नगर परिषदेचे २ नगरसेवक यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
अक्षय ढोबळे आणि राणा बनसोडे असं या नगरसेवकांचे नाव आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत या दोघांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भविष्यात आणखी १० नगरसेवक ठाकरेंना सोडणार असल्याचा दावा केला जात आहे. गुरुवारीच अक्षय ढोबळे यांनी आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून राजीनामा दिला. त्यात ते म्हणाले की, स्थानिक गटबाजीमुळे मी माझ्या युवासेना विभागीय सचिव तथा धाराशिव जिल्हाप्रमुख या दोन्ही पदांचा मान राखून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडत आहे. आपण सर्वांनी दिलेला मान सन्मान आणि साथ यासाठी धन्यवाद असं त्यांनी राजीनामा पत्रात लिहिलं. आमच्यासोबत नेहमी दुजाभाव होत असल्याचा कारण देत भाजपात प्रवेश करण्यात आला आहे.
Web Title: Uddhav Thackeray’s Shiv Sena lost, two corporators in BJP
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News