बारावीचा पेपर देऊन घराकडे जाणारे दोघे ठार, झाडावर दुचाकी आदळल्याने अपघात
Breaking News | Ahmednagar: बारावीचा पेपर देऊन घराकडे परत जात असलेल्या दहेली येथील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला दहेली गावानजीक भीषण अपघात, या अपघातात दोन विद्यार्थी ठार.
माहूर: तालुक्यातील अंजनखेड येथून बारावीचा पेपर देऊन घराकडे परत जात असलेल्या दहेली येथील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला दहेली गावानजीक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थी ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
किनवट तालुक्यातील मौजे दहेली येथील प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार व गणेश तोटावार हे बारावीचे विद्यार्थी दहेली तांडा येथील स्व. संगीताबाई माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयात शिक्षण घेत होते. बारावी परीक्षा केंद्र माहूर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालय होते. शनिवारी, दि. २ मार्च रोजी ते परीक्षा देण्यासाठी गेले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीतील बोर्डाचा पेपर देवून ते आपल्या गावाकडे परत निघाले असता दहेली गावानजीकच्या एका वळणावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली. यात प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, गणेश तोटावार हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी दहेलीचे सरपंच राकेश तोटावर यांनी खाजगी वाहनाद्वारे जखमींना दहेली तांडा येथील आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून रूग्णवाहिकेतून यवतमाळ येथे हलवण्यात आले. यवतमाळ येथे पोहोचल्यानंतर यातील प्रतिक लेंडे व कृष्णा बोंतावार या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गणेश तोटावर हा विद्यार्थी जखमी आहे. या सिंदखेड (ता. किनवट) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Web Title: Two people who were going home after giving their 12th paper were killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study