रिक्षावर दरड कोसळून संगमनेरातील दोघे जागीच ठार
Breaking News | Rickshaw Accident: प्रवासी रिक्षावर दरडीचा एक मोठा दगड कोसळून रिक्षातील दोघांचा जागीचा मृत्यू झाल्याची घटना. दगड पडून फाटले रिक्षाचा टप. माळशेज घाटातील दुर्घटना.
ओतूर : एका प्रवासी रिक्षावर दरडीचा एक मोठा दगड कोसळून रिक्षातील दोघांचा जागीचा मृत्यू झाल्याची घटना नगर- कल्याण महामार्गावर माळशेज घाटातील मंदिर व बोगदा या दरम्यान घडली आहे. मृतांमध्ये सात वर्षांच्या मुलाचा समावेश असून एक महिला जखमी झाली आहे. नगर- कल्याण महामार्गावर माळशेज घाटातील मंदिर व बोगदा या दरम्यान मंगळवारी (दि.११) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सोयम सचिन भालेराव (वय ७) व राहुल बबन भालेराव (वय ३५, दोघेही रा. चंदनापुरी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. दुर्घटनेनंतर दोन्ही मृतदेह आणि जखमी महिलेला त्याच रिक्षातून ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे जखमी महिलेवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या रिक्षात एकूण पाच प्रवासी प्रवास करीत होते. माळशेज घाटातील मंदिर व बोगदा या दरम्यान अचानक दरडीचा मोठा दगड रिक्षावर कोसळला. त्यात सोयम आणि राहूल यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. मृत मुलाचे वडिल रिक्षा चालवत होते. ते आणि अन्य एकजण या दुर्घटनेत बचावले. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे रिक्षाचालक असलेल्या वडिलांना भोवळ आल्याने ते ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोसळल्याचे समजते. या दुर्घटनेबाबत अणे माळशेज पट्ट्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Two people from Sangamner were killed on the spot when a rickshaw collapsed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study