संगमनेरात नाशिक-पुणे महामार्गावर बस-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू
Sangamner Accident News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ घडली. गुरुवारी (दि. ०९) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या ही घटना घडली. या अपघातात एक महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. रेखा साबळे (वय ५१, रा. जेलरोड, नाशिक) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पुरुषाचे नाव समजू शकलेले नाही. महिलेचा वाहन चालविण्याच्या परवाना तिच्याजवळ आढळल्याने तिची ओळख पटली.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवाई इलेक्ट्रिक बस (एमएच १२, व्हीएफ ९१९३) ही नाशिकहून पुण्याला जात असताना हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ पुणे लेनवर दुचाकी (एमएच १७, एपी ७७३८) ला बसची जोराची धडक बसली. यात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Web Title: Two killed in bus-bicycle accident on Nashik-Pune highway
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App