अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमावर गुन्हा दाखल
Pune Crime News : एका वर्गात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (sexual abused) केल्याची धक्कादायक घटना.
पुणे: वर्गात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील कोरेगाव परिसरात 18 जुलै 2023 रोजी घडली आहे. याप्रकरणी एका 19 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोंढवा हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रतिक मुंडकर (वय-19 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376/2/एन, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी प्रतिक मुंडकर पीडित मुलीच्या वर्गात शिकतो. त्याने मुलीला कोरेगाव पार्क परिसरातील एका बिल्डिंगमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी प्रतिक विरोधात तक्रार दाखल केली. ही घटना कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कोंढवा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sexual abused on a minor school girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App