धक्कादायक! कृषीमंत्री यांच्या मतदारसंघात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
कर्ज तसेच नापिकीमुळे हैराण झालेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
सिल्लोड: आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला असताना, पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्यासारखं टोकाचे पाऊल उचलत आहे. दरम्यान डोक्यावरील कर्ज तसेच नापिकीमुळे हैराण झालेल्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना उघडकीस आली असून, एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत.
आधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातून गेले. त्यानंतर आता शेतात लावलेले टरबुजाचे म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर या निराशेपोटी या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच गावातील आणि एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भागिनाथ पांडव यांच्याकडे तीन एकर शेती आहेत. त्यात त्यांनी टरबुजाची लागवड केली होती. मात्र, अपेक्षित उत्पादन झाले नाही. यामुळे कर्ज फेडायचे कसे, यामुळे ते तणावात होते. त्यांनी शुक्रवारी शेतातील घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान शनिवारी जनार्दन तायडे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदरील घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार ते ठोक्याने जमीन कसायचे. यात त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्यामुळे ते सतत चिंतेत होते. यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातच एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करत गळफास घेतला आहे.
Web Title: Two farmers committed suicide one after the other in the constituency of the Agriculture Minister
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App