Home नाशिक हृदयद्रावक! वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना अपघातात, दोन मुली, जावयाचा मृत्यू

हृदयद्रावक! वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना अपघातात, दोन मुली, जावयाचा मृत्यू

Nashik Accident News: वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू. (Death)

Two daughters, son-in-law die in an accident

नाशिक: जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता मालेगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नात गंभीर जखमी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात ही घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असताना दोघी मुली व जावयाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. उभ्या असलेल्या कंटेनरवर टाटा पंच गाडी जावून धडकल्याने हा अपघात झाला आहे.

अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत,  विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू झाला. तर नात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी नातेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मालेगावात हळहळ होत आहे.

Web Title: Two daughters, son-in-law die in an accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here