Home अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपमधून दोन नेते निलंबीत

अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपमधून दोन नेते निलंबीत

Breaking News | Ahilyanagar: राज्यात भाजपने 40 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे.

Two BJP leaders suspended in Ahilyanagar

अहिल्यानगर:  विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महायुतीमध्ये बंडखोरी रोखण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी झाले नाही. नगरसह राज्यात अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे.

विशेष करून भाजपमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे भाजपने 40 जणांवर निलंबनाची छडी उगारली आहे. यात जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश पक्षाचे प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिले असून श्रीगोंदा तालुक्यातील सुवर्णा पाचपुते आणि नेवासाचे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मरकुटे याचे निलंबन पक्षाने केल आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात निवडणूक लढण्यावरून नाराजी नाट्य पार पडले. यात तिकीट मिळाले नसल्याने अनेक उमेदवार बंडखोरी करत रिंगणात उतरले. यात श्रीगोंदा मतदारसंघात देखील भाजप महायुतीने अगोदर प्रतिभा पाचपुते यांना तिकीट घोषित केले. त्यानंतर प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी मागे घेतल्याने विक्रम पाचपुते महायुतीचे उमेदवार आहेत.

पण भाजपच तिकीट मिळवण्यासाठी तालुक्यातील सुवर्णा पाचपुते प्रयत्नशील होत्या. त्यांना तिकीट मिळले नाही. तिकीट मिळले नाही. यानंतरनंतर देखील त्यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेत उमेदवारी ठेवली आहे. भाजपने राज्यातील बंडखोरी केलेली आणि पक्षाचे आदेश मान्य नसल्याने अश्यना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

यात जिल्ह्यातील माजी आ. बाळासाहेब मुरकुटे आणि श्रीगोंदा येथील सुवर्णा पाचपुते याचा समावेश आहे. यात भाजपचे पदाधिकारी असून पक्ष शिस्त व अनुशासन भंग करणारे कृत्य केले आहे. यामुळे आपली ही कृती पक्ष अनुशासन भंग करणारी असून आपल्याला तात्काळ पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे निलंबन पत्राच्या यादीत म्हटले आहे.

भाजपच्यावतीने श्रीगोंद्यातील सुवर्णा पाचपुते आणि नेवाशातील माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. येणार्‍या निवडणुकीत पाचपुते आणि मुरकुटे यांच्या बंडखोरीचा काय परिणाम निकालावर होणार हे मतमोजणीनंतर समोर येणार आहे.

Web Title: Two BJP leaders suspended in Ahilyanagar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here