Home महाराष्ट्र Lock down: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने

Lock down: महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने

Towards Maharashtra Lock down

राज्यात कोरोनाचा वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अनेक शहरामध्ये वाढत्या कोरोनाच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसत आहे. त्यासाठी छोट्या कालावधीसाठी लॉकडाऊन व नाईट कर्फ्यू लागू केला आहे. काही राज्यात शाळा, महाविद्यालय बंद केली आहे. राज्यात लॉकडाऊनची चर्चा सुरु आहे. दरम्यान रविवारी मुख्यमंत्री यांनी जनतेशी संवाद साधला असून त्यांनी पुढील आठ दिवस महत्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहे.

पुढील आठ दिवसात जास्त रुग्ण वाढले तर लॉकडाऊन करावे लागेल अशी माहिती दिली आहे. कोरोना कमी झाला म्हणून मास्क न वापरणे, कार्यक्रमात लोकांची उपस्थित जास्त असणे, जास्त गर्दी करणे, सुरक्षित अंतर न ठेवणे.या कारणामुळे रुग्ण संख्या वाढू लागली आहे. यावर निर्बध घालणे महत्वाचे आहे. राजकीय,  धार्मिक, सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, गर्दी होणारे कार्यक्रम, मोठ्या यात्रा यावर पुन्हा काही दिवसांसाठी बंदी घातली जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यासाठी सर्वांनी काळजी घेणे महत्वाचे आहे.  

Web Title: Towards Maharashtra Lock down

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here