पकडलेल्या सापाला जंगलात सोडायला गेला अन घात झाला
Breaking Alandi | Pune Crime News: सापाला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
पुणे |आळंदी : पकडलेल्या सापाला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या सर्पमित्राला सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय-३२ रा. आळंदी) असे सर्पदंश होऊन मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव आहे.
सर्पदंश झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. निर्जनस्थळी कोब्रा जातीचा साप सोडताना त्यांच्या हाताला दंश झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी हे सर्प मित्र म्हणून परिसरात परिचित होते. आळंदी देहूफाटा येथे काळे कॉलनीत कोब्रा जातीचा साप निघाला होता. सर्प निघाल्याने त्याला पकडण्यासाठी ते गेले होते. त्या सापाला पकडल्यानंतर त्याला एका सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी ते गेले होते.
मात्र, साप सोडताना कोब्रा जातीच्या सापाने त्याला सर्पदंश केला. त्यानंतर त्यांना तातडीने आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सर्पदंशानंतर वेळेत उपचाराकरिता रुग्णालयात पोहचता न आल्याने त्यांच्या संपूर्ण शरिरात विष पसरले होते. याशिवाय, सर्पदंश झालेल्या भागावर कोणतीही प्राथमिक उपचार कापडी किंवा अन्य बांधणी केली नसल्याचे देखील समोर आले. राहुल स्वामी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. राहुल हा घरातील कर्ता पुरुष होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. त्यामुळे विकासच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी आळंदीतील ग्रामस्थ करत आहेत.
Web Title: to release the caught snake in the forest and was ambushed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News, Aj Smart News