Home अहमदनगर माजी शहरप्रमुखाच्या जाचाला कंटाळून एकाने पोलीस ठाण्यातच घेतले विषारी औषध

माजी शहरप्रमुखाच्या जाचाला कंटाळून एकाने पोलीस ठाण्यातच घेतले विषारी औषध

Ahmednagar | Kopargaon News:  सेनेच्या एका माजी शहर प्रमुखाच्या जाचाला कंटाळून एका ३५ वर्षे वयाच्या इसमाने कोपरगाव पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न.

Tired of being questioned by the former city chief, one took the poison in the police station itself

कोपरगाव: सेनेच्या एका माजी शहर प्रमुखाच्या जाचाला कंटाळून एका ३५ वर्षे वयाच्या इसमाने कोपरगाव पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला. आप्पासाहेब बाबासाहेब पवार असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी शहरप्रमुख नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून अंबिकानगर येथील रहिवासी आप्पासाहेब बाबासाहेब पवार यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पवार हे विषारी औषध प्राशन करत असल्याचे महिला कॉन्स्टेबल त्रिभुवन यांच्या लक्षात आले असता त्यांनी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल श्री. कुन्हे यांना कल्पना दिली. कुन्हे यांनी पवार यांच्या हातातून औषधाची बाटली हिसकावून घेत तात्काळ रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करत त्यांना लोणी येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला त्यानुसार त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारसासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्याप कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Web Title: Tired of being questioned by the former city chief, one took the poison in the police station itself

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here