कोल्हार –घोटी रस्त्याचे तीन तेरा, सुदैवाने बसमधील ३० प्रवासी वाचले
Akole Accident News: बसचा अपघात होताना वाचला, बस मधील ३० प्रवासी वाचले.
अकोले: तालुक्यातील कोल्हार घोटी राज्यमहामार्ग राजूर येथे रस्त्याचे काम नित्कृष्ट झाले असल्याने रविवारी बसचा अपघात होताना वाचला. सुदैवाने या बस मधील ३० प्रवासी वाचले आहेत.
कोल्हार घोटी रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ठ पद्धतीने झालेले आहे. पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. रस्ता फुटून खडी बाहेर पडली आहे. आजी माजी आमदार या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. बारी ते अकोले रस्त्याचे काम सुरू असून नगर येथील ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. मात्र पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. लोकप्रतिनिधी या कामाकडे दुर्लक्ष करत असून सार्वजनिक बांधकाम विभागात एकच अधिकारी काम करत असून ते कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. फोन केल्यावर मी साईडवर आहे असे उत्तर मिळाल्याने तक्रारदार हतबल होत आहे. माहितीच्या अधिकारात प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. कार्यालयात ताळमेळ नसून अधिकारी विकास कामाबाबत उदासीन आहेत हे चित्र समोर आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते भगवान बागुल यांनी मुख्यमंत्री यांचेकडे तक्रार दाखल केली असून या कार्यालयातील अधिकार्यांची तातडीने इतरत्र बदली करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. रस्त्याचे कामे न न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा योगेश कोंडार यांनी दिला आहे.
Web Title: Three Thirteen of Kolhar – Ghoti road, luckily 30 passengers of the bus survived Accident