Home क्राईम संगमनेर: दुचाकी अडवून लुटणाऱ्या तिघा जणांना अटक, पोलीस कोठडी  

संगमनेर: दुचाकी अडवून लुटणाऱ्या तिघा जणांना अटक, पोलीस कोठडी  

Sangamner Theft:  दुचाकी वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या तीन आरोपींना मुद्देमालासह पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Three persons who blocked the bike and robbed were arrested

संगमनेर: रस्त्याने जाणार्‍या- येणार्‍या दुचाकी वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम लुटणार्‍या तिघा जणांना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निंबाळे चौफुली येथे धनंजय बाबासाहेब वर्पे (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) हे आपल्या दुचाकीहून रात्री 11.30 वाजता घरी जात असतांना तिघा जणांनी मोटारसायकला त्यांची मोटारसायकल आडवी मारुन वर्पे यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन मोबाईल व रोख रक्कम काढून घेत पोबारा केला. तसेच प्रवरा नदी पुलाजवळ प्रभाकर चंदु आव्हाड (रा. वाघापूर, ता. संगमनेर) हे दुचाकीहून रात्री 10.15 वाजता घरी जात असतांना त्यांनाही तिघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेत पोबारा केला.

पोखरी हवेली ते निळवंडे कॅनॉल जवळून सागर विठ्ठल काळे (रा. पारेगाव खुर्द) हे दुचाकीहून रात्री 2 वाजता घरी जात असतांना तिघा अज्ञात व्यक्तींना त्यांना चाकुचा धाक दाखवून अडविले. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेत पोबारा केला. जांभुळवाडी फाट्या अमोल गवराम कोटकर (रा. पिंपळे, ता. संगमनेर) हे त्यांचा टेम्पो फौजी ढाब्यासमोर लावून टेम्पोतच झोपले होते. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास तिघे जण मोटारसायकलहून येवून त्यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम घेवून पसार झाले.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्या होत्या. एकापाठोपाठ एक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी पोलीस नाईक आण्णासाहेब दातीर, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे यांचे पथक तयार करुन त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार सदर पथकाने तपास करुन कलिम अकबर पठाण (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) या झरेकाठी येथून तर सलीम अकबर पठाण (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) यास धांदरफळ खुर्द येथून (Arrested) ताब्यात घेतले. तसेच जुनेद युनुस शेख (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) यास मदिनानगर संगमनेर येथून ताब्यात घेतले. सदर तिनही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चाकु, चोरीस गेलेले मोबाईल, रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. आरोपींना अटक करुन त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारकु जाणे करत आहे.

Web Title: Three persons who blocked the bike and robbed were arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here