मारहाण प्रकरणाचा घुलेवाडीत निषेध सभा, कडकडीत बंद
Sangamner News: मारहाणीचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकून सिताराम राऊत यांची बदनामी.
घुलेवाडी – माजी जि. प. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते आणि घुलेवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सिताराम पुंजा राऊत यांना जमिनीच्या मागील वादावरुन काल सोमवारी सकाळी दोन महिलांनी रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. तसेच या मारहाणीचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकून सिताराम राऊत यांची बदनामी करण्यात आली. या घटनेने घुलेवाडीसह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडून संताप व्यक्त केला जात असताना घुलेवाडीतील हजारो ग्रामस्थांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. तसेच गावात बंद पाळून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
माजी जि. प. सदस्य सिताराम राऊत व कविता संतोष अभंग यांचे जमीनीतील राहत्या रस्त्याच्या जागेवरुन जुना वाद आहेत. या वादातून काल सकाळी सिताराम राऊत यांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली.
आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून राऊत यांची बदनामी केली. दरम्यान यातील आरोपी भारत भोसले याने या महिलांना मारहाणीसाठी प्रवृत्त केले. स्वत:च्या आर्थिक लाभासाठी भोसले हा अनेकांना ब्लॅकमिलिंग करत असून त्याने धनंजय मुंडे यांच्या पत्नीलाही फसवले आहे. दिवसेंदिवस या भारत भोसलेच्या त्रासाला अनेक जण कंटाळले असा आरोप आज घुलेवीडत झालेल्या निषेध सभेत अनेक नागरीकांनी केला. या निषेध सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो नागरीक उपस्थित होते. या निषेध सभेनंतर नागरीकांनी आपले व्यवहार बंद ठेऊन झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच यापुढे अशी प्रवृत्ती वाढू नये यासाठी पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
Web Title: meeting in Ghulewadi against beating case, strictly closed