Home Accident News Accident: लग्नाला जाणाऱ्या कारला टेम्पोने कट मारल्याने भीषण अपघातात तिघे ठार

Accident: लग्नाला जाणाऱ्या कारला टेम्पोने कट मारल्याने भीषण अपघातात तिघे ठार

Three killed in car crash Accident

जळगाव | Accident: जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर भागात भरधाव मालमोटारीने कट मारल्याने कार नाल्यात उलटल्याने कारमधील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली.   या अपघातात अन्य तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये सहा महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे

दोनच दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील गारखेडा तेथे मालमोटार व पॅजो रिक्षाच्या धडकेत चार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी पुन्हा मालमोटार व कारचा अपघात (Accident) झाला. यातही तीन जागीच ठार झाले आहेत. भुसावळ येथील नागरिक पाचोर्‍याच्या दिशेने विवाह सोहळ्यासाठी कारने (एमएच १८, डब्ल्यू २४१२) निघाले होते. पाचोरा रस्त्याकडे जाणार्‍या टाकळी गावाजवळ भरधाव जाणार्‍या मालमोटारीने कारला कट मारल्याने चालकाचा ताबा सुटल्याने कार नाल्यात कोसळून तीन जागीच ठार झाले, तर दोन जण अत्यवस्थ असून, सहा महिन्यांचे बाळ अपघातातून वाचले आहे.

या अपघातात पंकज गोविंदा सैंदाणे (वय २४, राहणार तुकारामनगर), सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, राहणार त्रिमूर्तीनगर, भुसावळ) व प्रतिभा जगदीश सैंदाणे यांचा मृत्यू झालाय. हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत. स्पंदन याचे वडील पंकज यांचा अपघातात मृत्यू झाला असून, तो पित्रृप्रेमाला आता पोरका झाला आहे. बाळाची आई हर्षा सैंदाणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा महिन्यांच्या बाळाला जखमा झाल्या आहेत. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींना नागरिकांनी जामनेर येथील जी. एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

दरम्यान, अपघात होताच चालक मालमोटारीसह फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी पॅजो रिक्षा व मालमोटार यांच्यात अपघात होऊन तीन जण ठार झाले होते. त्यातच हा अपघात झाल्याने जामनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जामनेर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अंबादास पाथरवट तपास करीत आहेत.

Web Title: Three killed in car crash Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here