Home Accident News उभ्या कंटेनरवर कार धडकून तिघे ठार

उभ्या कंटेनरवर कार धडकून तिघे ठार

Accident News: इन्सेटमध्ये कंटेनरमध्ये घुसलेली कार, अंकुशनगरजवळ भीषण अपघात, मृतांमध्ये आठ वर्षीय मुलीचा समावेश.

Three killed as car collides with vertical container Accident

सोलापूर –धुळे महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरमार्गे बीडकडे निघालेली भरधाव अल्टो कार (एम.एच.२० बीएन. ७०७३) अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकार साखर कारखान्याजवळ (समर्थ) उभा असलेल्या कंटेनरवर ( एच.आर. ३८ डब्लु. ९२१७) धडकल्याने भीषण अपघात झाला. सदर कार कंटेनरखालीच दबली गेल्याने ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने कार बाहेर काढून कारमधील तिघांचे मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये दोन तरुणांसह एका सात ते आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

अमोल कैलास जाधव (२५, रा. लक्षाची वाडी ता. अंबड) ओमकार बळीराम गायकवाड (२०, रा. पिंपरखेड ता. अंबड) आणि माऊली संभाजी गायकवाड (८) अशी मृतांची नावे आहेत. त्यांचे

मृतदेह अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आहे. हा अपघात बुधवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंकुशनगर येथील साखर कारखान्याजवळ झाला.

अपघाताची माहिती मिळताच अंकुशनगरजवळील अपघातस्थळी जमलेली गर्दी. गोंदीचे सपोनि. रविंद्र ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून अगोदर कारमधील तिघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तिघांना बाहेर काढून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतू डॉक्टरांनी

त्यांना तपासून मृत घोषित केले. इकडे अपघातग्रस्त वाहनांना जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

Web Title: Three killed as car collides with vertical container Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here