Home क्राईम बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तिघा भावांनी गुप्तांग छाटून तरुणाचा खून

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तिघा भावांनी गुप्तांग छाटून तरुणाचा खून

परभणी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावाने आपल्या साथीदारांसह एकाची गुप्तांग छाटून हत्या (Murder).

Three brothers Murder a young man by amputating his private parts out of anger

परभणी: परभणी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील वनवाडी येथे बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावाने आपल्या साथीदारांसह एकाची गुप्तांग छाटून हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एका विरोधात पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  राजेभाऊ शिवाजी वाडीकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ राजेभाऊ वाडीकर, रामेश्वर उर्फ बबलू राजेभाऊ वाडीकर, नागेश संजय वाडीकर अशी आरोपी भावांची नावे आहेत.

खून झालेल्या राजेभाऊ शिवाजी वाडीकर याने आरोपी सोमनाथ राजेभाऊ वाडीकर, रामेश्वर उर्फ बबलू राजेभाऊ वाडीकर, नागेश संजय वाडीकर यांच्या बहिणीची छेड काढली होती. या गोष्टीचा राग मनामध्ये धरून तिन्ही भावांनी राजेभाऊ शिवाजी वाडीकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्यांनी राजेभाऊ वाडीकर यांच्या डोक्यामध्ये आणि गुप्तांगावर जबर मारहाण केली. यात राजेभाऊ याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी राजेभाऊ याची आई शशिकलाबाई वाडीकर यांनी पालम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळतात पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, पोलीस उपनिरीक्षक एस एस केंद्रे, एस पी कोलमवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मंगळवारी पहाटे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले. या पथकाने एका आरोपीला वानवडीच्या शिवारातून अटक केली. तर इतर दोन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Web Title: Three brothers Murder a young man by amputating his private parts out of anger

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here