1 मे महाराष्ट्र दिनाला राळेगण सिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची हत्या करणार, तरुणाची धमकी
Ahmednagar News: महाराष्ट्र दिनाला राळेगण सिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची हत्या करणार असल्याचा इशारा अहमदनगरच्या तरुणाने दिला, या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली.
अहमदनगर: 1 मे महाराष्ट्र दिनाला राळेगण सिद्धीत जाऊन अण्णा हजारेंची हत्या करणार असल्याचा इशारा अहमदनगरच्या तरुणाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात सुरु असलेल्या शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. तर अण्णा हजारेंच्या समर्थकांमधूनही खळबळ उडाली आह. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या नागरिकाने रागाच्या भरात इशारा दिला आहे.
संतोष गायधने यांनी म्हटले आहे की, शेतीच्या वादातून संगनमताने आपल्या कुटुंबावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला आहे. शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परिवारावर दबाव आणला आहे. कुटुंबावर अनेक खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतेय, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.
या प्रकरणात संतोष गायधने यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही काहीच कारवाई झाली नाही. अखेर या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. तसेच 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जाऊन हत्या करणार, असा इशारा संतोष गायधने यांनी दिला आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: Ralegun Siddhi and Kill Anna Hazare on 1st May Maharashtra Day
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App