Home महाराष्ट्र राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

Breaking News | Murder Case: पूर्ववैमनस्यातून ही हत्या (Murder) झाल्याचे तपासात उघडकीस.

Three arrested in connection with the murder of a NCP official

मुंबई : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे भायखळा विधानसभा मतदारसंघातील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येप्रकरणी भायखळा पोलिसांनी आनंदा अशोक काळे ऊर्फ अन्या, विजय ज्ञानेश्वर काकडे ऊर्फ पप्या आणि प्रफुल्ल प्रविण पाटकर या तिघांना अटक केली. त्यांना किल्ला न्यायालयाने १५ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी घोडपदेव येथे सचिन कुर्मी यांची हत्याराने वार करुन हत्या केली होती. या हत्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत भायखळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. हत्येचा गुन्हा दाखल होताच मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली . ही शोधमोहीम सुरु असातनाच आनंद काळे, विजय काकडे आणि प्रफुल्ल पाटकर या तिन्ही मारेकऱ्यांना काही तासांतच पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे.

चौकशीत या तिघांनीच संगनमत करुन सचिन कुर्मी यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यांच्यात पूर्ववैमनस्य होते, त्याच्या रागातून सचिन यांची हत्या करुन ते तिघेही पळून गेले होते. मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली.

Web Title: Three arrested in connection with the murder of a NCP official

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here