Breaking News | Nashik Crime: पोटावर चाकूने वार करून जखमी.
नाशिक: दिंडोरी नाक्यावर हातात चाकू फिरवत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अंमलदाराच्या पोटावर गुन्हेगाराने चाकूने दुखापत करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सराईत गुन्हेगार आता खाकीवरच चाल करत असल्याने नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदारावर हल्ला करणाऱ्या अवधूतवाडीतील विकी संजय जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याप्रकरणी अंमलदार नामदेव कारभारी सोनवणे (५७) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमाराला दिंडोरी नाक्यावर गीता हार्डवेअर दुकानासमोर संशयित विकी जाधव हातात चाकू मिरवत दहशत निर्माण करत असताना पोलिस अंमलदार नामदेव सोनवणे हे त्याला पकडत असताना संशयिताने सोनवणे यांच्या पोटावर चाकूने वार करून जखमी केले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: A police officer was stabbed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study