Home अहमदनगर Theft: धक्कादायक कारसह साडे तीन लाखांची रक्कम लांबविली

Theft: धक्कादायक कारसह साडे तीन लाखांची रक्कम लांबविली

Three and a half lakhs along with the car Theft

अहमदनगर |Theft| Ahmednagar: अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील अर्बन कॉलनीमधील (वीर सावरकर मार्गावर व्यवसायिक कार घेऊन त्यांच्या बंगल्याजवळ आले असता बंगल्याचे गेट  उघडून कार आतमध्ये पार्क करीत असताना पार्क करण्यापूर्वीच दोन  चोरट्यांनी त्यांना ढकलून देत कार लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या

व्यवसायिक मयुर विजयकुमार गांधी (वय 40 रा. अर्बन कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तातडीने या घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना दिली असता अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली.

अर्बन कॉलनीमध्ये गांधी यांचा सुंदर बंगला आहे. गांधी त्यांची कार घेऊन रात्री बंगल्याजवळ आले. कार बंगल्याच्या आतमध्ये पार्क करायची असल्याने ते गेट उघडण्यासाठी खाली उतरले. तेवढ्यात तेथे दोघे जण  आले आणि त्यांनी गांधी यांना बाजूला ढकलून देत कार पळवून नेली. या कारमध्ये साडेतीन लाख रूपयांची रोख रक्कम असल्याचे गांधी यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी अधिक  तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहे.

Web Title: Three and a half lakhs along with the car Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here