Home अहमदनगर अहमदनगर: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर अत्याचार

अहमदनगर: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर अत्याचार

Ahmednagar News: नगर तालुक्यातील खडकी येथील लॉजवर व नवी मुंबई येथील रूमवर अत्याचार (Rape)  केल्याची घटना उघडकीस.

Threatening to make the photo viral, Lodge was Rape

अहमदनगर:  मुळची पारनेर तालुक्यातील व सध्या नवी मुंबई येथे राहत असलेल्या युवतीवर शेवगाव येथील तरुणाने नगर तालुक्यातील खडकी येथील लॉजवर व नवी मुंबई येथील रूमवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी (दि. 22) रात्री उशिरा नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश रमेश कांबळे (रा. शेवगाव) याच्याविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी युवती पारनेर तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. ती सध्या नोकरीनिमित्ताने नवी मुंबई येथे राहते. तिची महेश कांबळे सोबत ओळख झाली होती. त्या ओळखीतून त्याने तिला एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. फिर्यादी युवती त्याला भेटण्यासाठी आली असता त्याने 11 ऑगस्ट 2023 रोजी रात्री खडकी येथील लॉजवर घेऊन जात अत्याचार केला. तिचे फोटो काढले व ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा 12 ऑगस्ट रोजी अत्याचार केला.

13 ते 16 ऑगस्ट दरम्यान महेश कांबळे याने पीडिता राहत असलेल्या नवी मुंबई येथील रूमवर तिच्यावर अत्याचार केला व कोणाला काही सांगितले तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान, सदरची घटना युवतीने आईला सांगितली व त्यांनी नगर तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग पुढील  तपास करीत आहेत.

Web Title: Threatening to make the photo viral, Lodge was Rape

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here