Home महाराष्ट्र महायुती सरकारला धोका? मविआला किती जागा मिळणार? लोकपोलच्या सर्व्हेनं उडवली खळबळ

महायुती सरकारला धोका? मविआला किती जागा मिळणार? लोकपोलच्या सर्व्हेनं उडवली खळबळ

Maharashtra Assembly Election 2024: Lokpoll Survey: लोकपोलच्या सर्व्हेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सध्याच्या सरकारची उलथापालथ होण्याची शक्यता.

threat to the coalition government

Assembly Election 2024: राज्याची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच लोकपोलच्या सर्व्हेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कारण या सर्व्हेच्या माध्यमातून महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना किती जागांवर विजय मिळेल, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणत्या आघाडीला 288 पैकी 145 जागांचा बहुमताचा आकडा गाठता येईल, याबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. अशातच लोकपोलच्या सर्व्हेनुसार, महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय मिळवता येईल. तर महाविकास आघाडीला 151-162 जागा मिळतील. इतर पक्षांना 5 ते 14 जागांवर बाजी मारता येईल, अशी शक्यता या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 10 सप्टेंबर 2024 मध्येही लोकपोलचा सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला होता. यावेळी लोकपोलच्या सर्व्हेत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील समस्या, महागाई, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयश, महाराष्ट्रात विकासकामांचा अभाव आणि वाढती बेरोजगारी, या सर्व गोष्टींमुळं महायुती सरकारला जोरदार विरोध होत आहे. काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळाल्यानं भाजप समोर मोठं आव्हान राहणार आहे. परंतु, सामाजिक चळवळ राबवण्यात काँग्रेसकडे सातत्य नसल्याचं पाहायला मिळत आहे, असही मुद्दा या सर्व्हेत उपस्थित करण्यात आला.

भाजपला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्रात आणि सरकारमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रीयता वाढत आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत होत असल्याच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे. राजकीय वर्तुळात हा मुद्दा महत्त्वाचा नरेटिव्ह आहे, अशा मुद्द्यांवरही लोकपोलच्या सर्व्हेत प्रकाश टाकण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाम भूमिका घेण्यात उद्धव ठाकरे यांना अपयश येत आहे.वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. पक्षवाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने इतर छोट्या पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळत आहे, हे मुद्देली लोकपोलच्या सर्व्हेत नमूद करण्यात आले होते.

Web Title: threat to the coalition government? How much space will Maviya get?

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here