संतापजनक! तेरा वर्षीच्या पुतणीवर काकाकडूनच अत्याचार
Solapur Crime: काकाकडे राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीवर काकानेच अत्याचार (abused) केल्याची घटना.
सोलापूर: दिव्यांग वडील, आईने केलेले दुसरे लग्न यामुळे काकाकडे राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीवर काकानेच अत्याचार केला आहे. शहरातील या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
तिने फिर्यादीत म्हटले की, घरच्या परिस्थितीमुळे पालनपोषणाची जबाबदारी आजी-आजोबांकडे आली. एक वर्षापूर्वी काकाने आजी- आजोबांकडून पीडितेला त्यांच्या
कुटुंबामध्ये आणले. दरम्यान, २९ एप्रिलला संशयित आरोपीने मुलीचे तोंड दाबून दुसऱ्या खोलीत नेले आणि अत्याचार केला.
पीडितेने हा प्रकार तिच्या वडिलांना व आजी-आजोबांना सांगितला; पण त्यांनी वाच्यता केली नाही. १ मे रोजी काका आजोबाच्या घरी येऊन भांडण करीत होता. तेव्हा पीडितेने हिंमत करून डायल ११२ ला फोन करून सर्व प्रकार सांगितला.
Web Title: Thirteen year old nephew abused by his uncle
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App