Home अकोले दुधाच्या दरवाढीसाठी गणोरेच्या उपोषणाचा सहावा दिवस, तब्येत खालावली,  शेतकरी आक्रमक

दुधाच्या दरवाढीसाठी गणोरेच्या उपोषणाचा सहावा दिवस, तब्येत खालावली,  शेतकरी आक्रमक

Breaking News | Akole: दुधाच्या दरवाढीसाठी अकोल्यातील शेतकरी आक्रमक.

the sixth day of Ganore's hunger strike for milk price hike

अकोले: महाराष्ट्र शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधास ४० रूपयांचा भाव जाहीर करावा, या मागणीवर अकोले तालुक्यातील गणोरे गावात बेमुदत उपोषणास बसलेले आंदोलक संदीप दराडे व शुभम आंबरे यांच्या उपोषणाचा शनिवार सहावा दिवस असून या दोघांची तब्येत खालावली आहेत. दरम्यान, जोपर्यंत महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपोषणकर्त्यांना भेटून प्रतिलिटर दुधास ४० रुपयांचा भाव जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही स्थितीत हे उपोषण स्थगित करण्यात येणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यासह दूध उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला. परिसरातील ११ गावांतील गावकऱ्यांसह नागरिकांनी या अमरण उपोषणास शनिवारी संपूर्ण दिवसभर गाव बंद आंदोलन करून पाठिबा दिला.

यात गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, देवठाण, सावरगावपाट, वडगाव लांडगा, वीरगाव, पिंपळगाव निपाणी, पिंपळगाव कोंजीरा, समशेरपूर, कळस बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे. गणोरे गावाजवळील परिसरातील सुमारे २५ गावांतील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसह नागरिक दररोज उपोषणस्थळी भेट देत आहेत. या उपोषणास पाठिंबा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारकडून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मंजूर करून उपोषण स्थगित करण्याचे आवाहन उपोषणकर्त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक व शेतकऱ्यांनी केले.

आंदोलकांची तब्येत बिघडत आहे. मात्र राज्याचे दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपोषणकर्त्यांना भेटून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रतिलिटर दुधास ४० रुपयांचा भाव जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्ते संदीप दराडे यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत उपोषणास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार वैभव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, कॉम्रेड डॉ. अजित नवले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मधुकर तळपाडे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी पाठिबा व्यक्त केला.

Web Title: the sixth day of Ganore’s hunger strike for milk price hike

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here