भावानेच केला बहिणीवर अत्याचार, संतापजनक प्रकार
Breaking News | Jalgaon Crime: काकाकडे राहत असलेल्या पुतण्याने आपल्या बहिणीवर अत्याचार (abused) केल्याचा प्रकार.
जळगाव: जळगावात भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिन्यांपासून काकाकडे राहत असलेल्या पुतण्याने आपल्या बहिणीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्शया माहितीनुसार, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास त्यांच्यासोबत तिच्या काकांचा मुलगा देखील वास्तव्यास आहे. ही अल्पवयीन मुलगी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. मुलीचे कुटुंबिय घरी नसतांना मुलीचा चुलत भाऊ हा तिच्यावर अत्याचार करीत होता. गेल्या चार महिन्यांपासून तो मुलीवर अत्याचार करीत असल्याने मुलीला मारहाण देखील करीत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
याप्रकरणी समुपदेशकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात पोक्सोकायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर या करीत आहे.
Web Title: the brother who abused the sister
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study