Home पुणे कोयता गँगची दहशत! मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात

कोयता गँगची दहशत! मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात

Breaking News | Pune Crime: कोयता व कुऱ्हाडीच्या घावामुळे तरुणाचा एक हात मनगटापासून आणि दुसरा हात कोपऱ्यापासून तुटला.

Terror of Koyta Gang Wrist, arm broken from corner

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारजे परिसरात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्यासह कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. कोयता व कुऱ्हाडीच्या घावामुळे तरुणाचा एक हात मनगटापासून आणि दुसरा हात कोपऱ्यापासून तुटला. त्यानंतर टोळक्याने परिसरातील नागरिकांवर कोयते उगारून दहशत निर्माण केली.

अक्षय राजेंद्र कांबळे (वय २८, रा. म्हाडा वसाहत, वारजे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा ते सातजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुबेर करीम शेख (वय २२, रा. म्हाडा वसाहत, वारजे) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अक्षय कांबळे, त्याचे मित्र जुबेर शेख, फारुख मणियार हे शुक्रवारी (२० डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास म्हाडा वसाहत परिसरात शेकोटी पेटवून थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. टोळक्याने अक्षय याच्यावर कोयते आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये त्याच्या उजव्या हाताचे मनगट आणि डाव्या हाताचा कोपरा तुटून वेगळा झाला. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश बडाख अधिक तपास करीत आहेत.

याप्रकरणी  दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर केले असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.

जखमी तरुणाचे दोन्ही हात तुटले होते. त्वचेमुळे तुटलेला भाग लोंबकळत होता. तरुणाला सुरुवातीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे हातांवर शस्त्रक्रिया करून हात जोडण्यात आले आहेत. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे किंवा नाही, हे आताच सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले.

Web Title: Terror of Koyta Gang Wrist, arm broken from corner

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here