Accident: टेम्पो व मोटारसायकलचा अपघात, व्यावसायिकेचा मृत्यू
Parner Accident: सुपा येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यात अपघाताची घटना.
पारनेर: अहमदनगर पुणे महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. रविवारी सुपा येथे टेम्पो व मोटारसायकल यांच्यात अपघाताची घटना घडली. यामध्ये सुपा येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब पवार यांच्या मृत्यू झाला आहे.
याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान एक मालवाहतुक टेम्पो हा सुपा नगर रोडवरील दौलत पेट्रोलपंपा समोर रस्ता ओलांडत असतांना त्याच वेळी सुपा येथील संदीप उद्योग समुहाचे सर्व्हासर्वे बाळासाहेब पवार हे पवार वाडीकडून हॉटेलवर येत असतांना टेम्पो व मोटारसायकल याची धडक झाली. यात पवार हे गंभीर जंखमी झाले होते. त्यांना तेथील स्थानिक व्यावसायिक व रहिवाश्यांनी ताबडतोब सुपा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु परिस्थिती थोडी गंभीर वाटल्याने पवार परिवाराने त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू असतांना सांयकाळी पाच वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली अशी माहिती सुपा पोलिसांनी दिली. बाळासाहेब पवार हे सुप्यातील हॉटेल व्यावसायिक होते. त्यांच्या जाण्याने सुपा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Tempo and motorcycle accident, businessman dies