TET गैरप्रकारातील शिक्षकांचे वेतन रोखले
Ahmednagar | TET Teacher Salary: अपात्र ठरलेल्या ५७६ शिक्षकांचे ऑगस्टपासून वेतन न देण्याचे आदेश.
अहमदनगर: घोटाळेबाज शिक्षकांना मोठा दणका बसला आहे. TET गैरप्रकारातील शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांनी अपात्र ठरलेल्या ५७६ शिक्षकांचे ऑगस्टपासून वेतन न देण्याचे आदेश दिले आहेत. . परीक्षा परिषदेच्या यादीतील 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. तसंच या उमेदवारांचा स्कूलर आयडी गोठवण्यात आले आहे.
2019-2020 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले होते. हा TET घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पुणे सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात आला. या तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. यामध्ये तब्बल 7 हजार 874 उमेदवार गैरप्रकारात सहभागी होते.
TET परीक्षेचा निकाल 28 ऑगस्ट 2020 लागला होता. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी 16 हजार उमेदवार हे पात्र ठरलेले होते. यापैकी अनेक उमेदवार हे घोटाळा करुन पास झाल्याचे धक्कादायक खुलासा समोर आला. यासोबतच 2013 पासून शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली होती.
TET घोटाळ्यामध्ये पोलिसांकडून शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपेला अटक करण्यात आली होती. यासोबतच शिक्षण परिषदेचा माजी आयुक्त सुखदेव ढेरे, जी ए टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख अशा अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.
Web Title: Salaries of TET malpractice teachers withheld