अहमदनगर: घरावर छापा मारताच अबब… घरातच थाटला..
Ahmednagar News: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरवंडी कासार येथील एका घरावर छापा (Raid) टाकला असता माव्याचा कारखाना, मावा बनविणारा ताब्यात.
अहमदनगर : एकाने घरातच सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करण्याचा कारखाना थाटला होता. यंत्राद्वारे तयार केलेला मावा तो चोरीछुपे विकत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाले आहे. सुगंधी तंबाखू, सुपारी आणि यंत्र असा एकूण पावणेतीन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे एक व्यक्ती घरातच सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खरवंडी कासार येथील एका घरावर छापा टाकला असता, दत्तात्रय मथाजी अंदुरे (वय २९, रा. खरवंडी कासार) हा सुगंधी तंबाखू व सुपारीचे मिश्रण करून मावा तयार करीत असल्याचे आढळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या घरातून सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा बनविणारे यंत्र असा एकूण २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
आरोग्यास धोकादायक असलेल्या माव्याची खुलेआम विक्री सुरु आहे. नगर शहरातून ग्रामीण भागात माव्याचा पुरवठा केला जात असून, मावा तयार करून विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. तरुण पिढी सुगंधी माव्याच्या आहारी जात असून, यामुळे तोंडाचे कॅन्सर होण्याचे प्रमाणही अधिक आहे. ही बाब पोलिस व अन्न प्रशासन गांभीर्याने घेताना दिसत नाही. माव्याचे असे कारखाने एकट्या पाथर्डी तालुक्यातच नाही, तर अन्य तालुक्यांतही आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Web Title: team of the local crime branch raid a house in Kharwandi Kasar.
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App