अहिल्यानगर: शिक्षक दिरानेच भावजईचा विनयभंग
Breaking News | Ahilyanagar Crime: शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचा तिच्या दिराकडूनच विनयभंग.
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मढी रोडवर शेतात शेळ्या चारणाऱ्या महिलेचा तिच्या दिराकडूनच विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेने दिराविरुद्ध पाथर्डी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, तिसगाव येथील मढी रस्त्यावर माझ्या लहान मुलीसोबत स्वतःच्या शेतामध्ये ११ एप्रिल रोजी शेळ्या चारत होते. त्यावेळी तेथे लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. आरडाओरड केल्यानंतर महिलेचे वडील तेथे तत्काळ आले. यातील आरोपीने संबंधित महिलेच्या वडिलांना आणि तिच्या लहान मुलीला लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ केली. तुम्ही कोणीही इथे राहू नका, असे म्हणत, जीवे मारण्याची धमकी दिली.
शिक्षक असलेल्या दिरानेच भावजईचा विनयभंग केल्याची फिर्याद पाथर्डी पोलिसात दाखल झाल्याने तिसगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Teacher’s brother-in-law molests sister-in-law