Suicide: प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटमुळे खळबळ
बीड | Beed: एका प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील पालवन चौक परिसरात घडली आहे. राहुल ईश्वर वाघमारे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. राहुल वाघमारे हे बीड शहरातील प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. काल त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कुटुंबियांना आढळून आल्याने घटनेची पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी शिवाजीनगर पोलिसांना मयत शिक्षकाच्या घरात एक सुसाइड नोट देखील आढळून आली. यामुळे खळबळ उडाली आहे. सहकारी प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून, सदर शिक्षकाने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लाखेंसह एकावर 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत शिक्षकाने सहकारी प्राध्यापक बाळासाहेब लाखे आणि मुन्ना यांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत. त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले असून मागील दोन वर्षांपासून लाखे हे त्यांना मानसिक त्रास देत असल्याचे नोटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्राध्यापक लाखे यांची चौकशी सुरू असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Teacher commits suicide after being harassed by a professor