Home क्राईम संगमनेर: चारित्र्यावर संशय, मारहाण त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा

संगमनेर: चारित्र्यावर संशय, मारहाण त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: चारित्र्यावर संशय घेत तू आमच्या कुटुंबाला वारस देवू शकत नाही, असे म्हणून एका ३५ वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा.

Suspicion on character, suicide of a married woman due to beatings, crime against three

संगमनेर: चारित्र्यावर संशय घेत तू आमच्या कुटुंबाला वारस देवू शकत नाही, असे म्हणून एका ३५ वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पती, सा सरा, सासू या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती सचिन गुंजाळ (वय ३५, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वाती हिचा सचिन गंगाधर गुंजाळ यांच्याशी २०११ मध्ये विवाह झाला होता. तिचा पती सचिन गुंजाळ हा आर्मीत असल्याने तो वर्षातून दोन ते तीन वेळेस गावी येत असे. दरम्यान स्वाती ही फोनवर कुणाशी तरी बोलते म्हणून तिच्यावर संशय घेण्यात आला. त्यातून तिला पती, सासू, सासरे हे मानसिक व शारिरीक त्रास देत होते. ही बाब स्वाती हिने माहेरी सांगितली. त्यानंतर माहेरच्या मंडळींनी येवून तिची समजूत काढली. मात्र त्यानंतरही वारंवार या घटना होत होत्या. स्वाती हिला पहिली मुलगी झाली त्यानंतर दुसरीही मुलगीच झाली. त्यावरुनही सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरु केला. तू आमच्या कुटुंबाला वारस देवू शकत नाही म्हणून स्वाती हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिला माहेरी जाणे येणे बंद केले. माहेरच्या मंडळींनी ही तिच्याकडे यायचे नाही, अशी ताकीद तिला दिली होती. स्वाती हिला तिच्या आई वडीलांना देखील फोन करु देत नव्हते. स्वाती ही होत असलेला त्रास माहेरी सांगत होती. आईवडीलांनी तिला पुन्हा समजावून सांगितले. परिस्थिती सुधारेल असे सांगून ते निघून गेले.

दरम्यान स्वाती हिला मुलगा झाला. त्यानंतरही पती सचिन गंगाधर गुंजाळ, सासरा गंगाधर तुकाराम गुंजाळ, सासू मंदाताई गंगाधर गुंजाळ यांनी स्वातीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करु लागले. अखेर सासरच्या छळास कंटाळून दि. १९ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास स्वाती हिने राहत्या घरात वरील रुममध्ये सिलींगला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

याबाबत सुशांत सखाराम काशिद यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सचिन गंगाधर गुंजाळ, सासरा गंगाधर तुकाराम गुंजाळ, सासु मंदाताई गंगाधर गुंजाळ (सर्व रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Suspicion on character, suicide of a married woman due to beatings, crime against three

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here