Home संगमनेर Sangamner | संगमनेरच्या चार पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन

Sangamner | संगमनेरच्या चार पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन

Suspension of four Sangamner police personnel

संगमनेर  | Sangamner:  संगमनेरच्या कारागृहात एका कैद्याचा वाढदिवस जोरदार साजरा झाल्याची घटना उघडकीस आल्याने जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याची गंभीर दखल घेत संगमनेरच्या कारागृहात बंदोबस्तास असलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. या कारवाईने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

संगमनेर शहरातील कारागृहात काही दिवसांपूर्वी शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याचा वाढदिवस जोरदार धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी मोठा केकही आणण्यात आला होता. संबंधितांची चांगलीच कानउघाडणी करून त्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तातडीने कारवाई करत चार पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केली.

यामध्ये संजय साबळे, रविंद्र कुलकर्णी (संगमनेर शहर पोलिस ठाणे), रामदास भांगरे (तालुका पोलीस ठाणे), आनंदा भांगरे (घारगाव पोलीस ठाणे) या चार जणांचा समावेश आहे. या कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश काल सकाळी संगमनेरच्या अधिकार्‍यांकडे पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली. संगमनेरच्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना तंबाखू, गुटखा सहज उपलब्ध होत असतो.

या कारागृहात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांसमोरच कैद्यांना या वस्तू मिळतात. असे असतानाही संबंधित कर्मचार्‍यांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले होते. एका कैद्याची मजल थेट वाढदिवस साजरा करण्यापर्यंत पोहोचली होती. 

Web Title: Suspension of four Sangamner police personnel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here