Home महाराष्ट्र मोठी बातमी: OBC Reservation ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

मोठी बातमी: OBC Reservation ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Supreme Court rules on OBC reservation

OBC Reservation:  सध्या देशात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा निर्णय दिलेला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला असून राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी अहवालात नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. जोपर्यंत पुढील निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

राज्य मागासवर्गाच्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. त्याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसी प्रतिनिधीत्वाची माहिती अहवालात नाही. त्याशिवाय, कोणत्या कालावधीतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.

आता या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय (without OBC reservation) पार पाडाव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. पुढील निर्देश येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. ओबीसींचे राजकीय प्रतिनिधीत्वाची माहिती योग्यप्रकारे सादर झाली नसल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

Web Title: Supreme Court rules on OBC reservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here