धक्कादायक! दहावीचा पेपर सुरु होणार तेच अचानक शिक्षक जमीनीवर कोसळला
Sinner Heart Attack Dies: पेपर सुरु होण्यापूर्वी तयारी सुरु असताना अचानक पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन.
सिन्नर: राज्यात दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना घडली आहे. पेपर सुरु होण्यापूर्वी तयारी सुरु असताना अचानक पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. यामुळे शाळा परिसरासह मित्र परिवार आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ६ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. यासाठी सिन्नर येथील महात्मा फुले विद्यालयात तयारी सुरु होती. या संदर्भातील सहकारी शिक्षक वर्गात होते. याच ठिकाणी शिक्षक किरण भास्करराव गवळी हे देखील पर्यवेक्षणासाठी होते. नियोजन सुरु असताना अचानक गवळी यांना हृदय विकाराचा झटका आला. ते चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने शाळेतील शिक्षकांनी त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
किरण भास्करराव गवळी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. गवळी हे सिन्नर शहरातील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सहा मार्च रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर होता. यावेळी गवळी हे सहकाऱ्यांसह पेपरची तयारी करत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले आणि बेशुद्ध झाले.
शाळेतील शिक्षकांनी त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचे हृदय बंद पडल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. किरण गवळी यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रामदास धुमाळ करत आहेत.
Web Title: Supervising teacher tragically dies of heart attack
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App