Home अकोले निळवंडे जलाशयातून उन्हाळी हंगाम सिंचन आवर्तन सुरु

निळवंडे जलाशयातून उन्हाळी हंगाम सिंचन आवर्तन सुरु

Summer season irrigation cycle starts from Nilwande Dam

अकोले: भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार उन्हाळ हंगाम सिंचन आवर्तन शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सुरु झाले. निळवंडे धरणातून (Nilwande Dam) १२०० क्यूसेक्स वेगाने प्रवरा नदीपात्रातून लाभक्षेत्राकडे झेपावले आहे.

भंडारदरा धरणात ८ हजार ०२४ दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणात ५ हजार ०५१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. उन्हाळी आवर्तन साधारणतः २५ दिवस राहणार असून अडीच टीएमसी पाणी खर्च होण्याची शक्यता आहे. लाभक्षेत्रातील अंतिम टोकाला बेल पिंपळगाव परिसरात पाणी पोहोचल्यावर आवर्तन थांबेल अशी माहिती सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितली आहे.   

Web Title: Summer season irrigation cycle starts from Nilwande Dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here