बारावीचा निकाल पाहण्यापूर्वीच विद्यार्थिनीची आत्महत्या
Breaking News | Suicide Case: इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना.
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज, सोमवारी यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हिना ज्ञानेश्वर आडे (१७, रा. पांढुर्णा, ता. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. हिना नेर येथील दि इंग्लिश स्कूल येथे बारावीत शिक्षण घेत होती. आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. हिना हिच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने तिने आपल्या भावाला निकाल पाहण्यासाठी सांगितले होते.
भाऊ व वडील लग्नाला गेले होते. त्या ठिकाणी मोबाइलवर भावाने निकाल पाहिला. यामध्ये तीला ४७ टक्के गुण मिळाले असून ती उत्तीर्ण झाली होती. मात्र, गुण कमी मिळाल्याने भावाने तिला किती गुण मिळाले हे न सांगता, घरी आल्यावर निकाल सांगतो, असे सांगितले होते. यावरून, आपण परीक्षेत अनुत्तीर्ण झालो, असे समजून तिने घरी कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी परत आल्यावर हा प्रकार उजेडात आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
Breaking News: suicide of a 12th year old student