Suicide: प्रेमविवाहानंतर गरोदर प्राध्यापिकेनं संपवलं जीवन
Crime News: इंजिनिअरींग महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या एका गरोदर महिलेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
औरंगाबाद: औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनिअरींग महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या एका गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष) असं मयत महिला प्राध्यपिकेचं नाव आहे. वर्षा या आपल्या पतीसह औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात राहत होत्या. शुक्रवारी महाविद्यालयातून ड्युटीवरून घरी परतल्यानंतर त्यांनी आपल्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच वर्षा यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केलं. परंतू तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. वर्षा या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. दहा वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून त्यांना सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप मयत वर्षा यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
Business Idea | फक्त १ हजार रुपयांमध्ये घर बसल्या सुरु करा बिजनेस होईल डबल फायदा | Earn Money
याप्रकरणी शहरातील पुंडलिकनगर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती.
Web Title: Suicide News pregnant professor ends her life after a love marriage
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App