Home औरंगाबाद चुलत बहिणीच्या लग्नासाठी पुण्याहून गावी, शेतात गेला अन्… बापाचा टाहो

चुलत बहिणीच्या लग्नासाठी पुण्याहून गावी, शेतात गेला अन्… बापाचा टाहो

Breaking News | Ch Sambhajinagar: ३३ वर्षीय लाईनमनणे स्वतःच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Suicide by taking galfas with the help of self, shetatil limbachya jhadala 

छत्रपती संभाजीनगर: चुलत बहिणीच्या लग्नासाठी पुण्यावरून आलेल्या ३३ वर्षीय लाईनमनणे स्वतःच्याच शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातील कोळी बोडखा शिवारात शनिवारी उघडकीस आली. तरुणाने आत्महत्या का? केली याचं कारण अद्याप समजू शकले नाही.

सचिन बबन टेकाळे (वय 33 वर्ष राहणार केकत जळगाव तालुका पैठण) असे गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन टेकाळे हा केकत जळगाव या गावचा रहिवासी आहे. तो विवाहित असून पुण्यातील महावितरण कार्यालयामध्ये लाईनमन म्हणून नोकरी करत होता. ६ मे रोजी चुलत बहिणीचे लग्न असल्याने तो गावी आला होता. लग्न होऊन गेल्यानंतरही सचिन गावीच होता. गावातील कामे दोन दिवसात आठवण तो पुण्यात पुन्हा कामावर रुजू होणार होता. दरम्यान, शनिवारी सचिन घराबाहेर पडला. बराच वेळ झाला मात्र तो घरी परतला नाही.

सचिनचे वडील बबन टेकाळे हे दुपारच्या सुमारास कोळी बोडखा येथील शेतात फेरफटका मारायला गेले होते. शेतात गेल्यानंतर त्यांना लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. जवळ जाऊन बघितले असता सचिनने गळफास घेतला होता. हे बघून सचिनच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. नागरिकांच्या मदतीने सचिन तात्काळ पाचवड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, सचिनने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

आपलं आयुष्य संपवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा सुरू केला. यावेळी सचिन टेकाळे यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका, जीव देण्याचा निर्णय मीच घेतला आहे, मला माफ करा, गाडीच्या हप्ते थकले आहेत ते भरून टाकावे असा मजकूर लिहिला होता.

Breaking News: Suicide by taking galfas with the help of self, shetatil limbachya jhadala 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here