अहमदनगर: साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: एका ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.
राहुरी : तालुक्यातील म्हैसगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्घटना सोमवारी (१०) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. सोमनाथ ऊर्फ संदीप अरुण विधाटे (३२, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विधाटे याच्या आत्महत्येने म्हैसगावातील नातवाईकांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
मृत सोमनाथ कुटुंबियांसह म्हैसगाव येथे राहात होता. तो हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा होता. अनेक
वर्षे त्याने बँकिंग क्षेत्रात काम केले, मात्र काही महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडून किराणा व्यवसाय
थाटला होता. दि. १० रोजी रात्री त्याने स्वतःच्या घराच्या छताला साडीच्या सहाय्याने गळफास घेत
आत्महत्या केली. यावेळी घरातील कुटुंबातील सदस्यांना सोमनाथ गळफास घेतलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. त्याला तत्काळ रुग्णालयात हलविले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृत सोमनाथ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ-भाऊजयी, बहिण, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
Web Title: Suicide by hanging with saree
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study