विवाहित महिलेच्या चारीत्र्यावरुन शिविगाळ केल्याने तिने संपविली जीवनयात्रा
Ahmednagar | Shevgaon | शेवगाव: शेजारील लोकांनी एका विवाहित महिलेला तिच्या चारीत्र्यावरुन केलेली शिविगाळ जिव्हारी लागल्याने हा अपमान सहन न झाल्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची अत्यंत धक्कादायक घटना शेवगाव येथे घडली आहे.
संगिता आशिष परदेशी ( वय-३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जमीर उर्फ गोटया रफीक शेख, त्याची पत्नी आसमा जमीर शेख व त्यांचा मुलगा शाकीर जमीर शेख असे त्या आरोपींचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, वरील तिघा जणांनी मयत महिलेस वारंवार तिच्या चारीत्र्यावरुन शिविगाळ केली होती. तिला हा अपमान सहन न झाल्याने तिने आपले जीवन संपविल्याची फिर्याद महिलेचा पती आशिष विजय परदेशी यांनी दिली आहे.
Web Title: Suicide by abusing the character of a married woman