बलात्कारातील संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
Breaking News | Nashik: ठाण्यातील अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार.
नाशिक: ठाणे येथील अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या संशयिताने घोटी-सिन्नर मार्गावर आत्महत्येचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा येथील शिळ डायघर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. संशयितावर सध्या पोलिसांच्या निगराणीखाली उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होताच ठाणे पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत. मुंब्रातील शिळ डायघर पोलीस ठाणे हद्दीत ३ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी ठाणे पोलीस संशयिताच्या मागावर असतानाच गुरुवारी रात्री घोटी-सिन्नर मार्गावरील उभाडे गावच्या शिवारात तो बेशुद्धावस्थेत आढळला. कुटुंबीयांनी शोधाशोध करत जिल्हा रुग्णालय गाठल्याने संशयिताची ओळख पटली आहे. संशयिताने विषारी औषध सेवन केल्याचा अंदाज बांधला जात आहे.
Web Title: Suicide attempt of rape suspect
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News