नापास झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
Nagpur: विद्यार्थिनी थर्ड सेमिस्टरच्या परीक्षेत तीन विषयात नापास झाली. धक्क्यामुळे तिने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
नागपूर: कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेली विद्यार्थिनी थर्ड सेमिस्टरच्या परीक्षेत तीन विषयात नापास झाली. या धक्क्यामुळे तिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी ३० एप्रिलला रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.
गौरी सुनील भावेकर (२१, रा. लुनावतनगर, धामणगाव रेल्वे, अमरावती), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आई वडिलांना एकुलती एक मुलगी होती. गौरीचे वडील शिक्षक असून, आई गृहिणी आहे. गौरी प्रियदर्शिनी गर्ल्स होस्टेलमध्ये दोन मैत्रिणींसोबत राहत होती. नुकताच गौरीच्या थर्ड सेमिस्टरचा निकाल लागला होता. यात ती तीन विषयांत नापास झाली, त्यामुळे गौरी तणावात होती. रविवारी गौरीने आपल्या फॅनला गळफास घेत आपले जीवन संपविले.
Web Title: Student commits suicide due to failure
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App