अहमदनगर: पोलिसांवर दगडफेक; दहा जणांना अटक
Breaking News | Ahmednagar: मिरवणुकीतील तरुणांकडून दगडफेक, श्रीरामपुरात ३० जणांवर गुन्हा दाखल.
श्रीरामपूर : शहरात संदल निमित्त काढण्यात आलेली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळासाठी रेंगाळली. यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला असता त्यांच्यावर मिरवणुकीतील तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना किरकोळ मार लागला. शहर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात २० ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दहा तरुणांना अटक करण्यात आली आहे.
संदल निमित्त शहरातील संगमनेर रस्त्यावरून येत छत्रपती शिवाजी चौकातून ही मिरवणूक जाणार होती. दरवर्षी या संदलचे आयोजन केले जाते. मात्र गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान मिरवणूक शिवाजी महाराज चौकात आली. यावेळी मिरवणुकीत डीजे सुरु होता. पोलिसांनी मिरवणुकीतील तरुणांना चौकातून पुढे जाण्याची विनंती केली. यावेळी येथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र मिरवणूक तेथे बराच वेळी रेंगाळली, अशी माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.
अखेर पोलिसांनी मिरवणूक तेथून पुढे काढण्यासाठी प्रयत्न केले. याच दरम्यान जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यात दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या डोक्याला इजा झाली. मात्र शुक्रवारी उपचार घेऊनही दोन्ही पोलिस कर्मचारी कामावर हजर झाले, असे देशमुख यांनी सांगितले. पोलिसांनी अज्ञात २० ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी व्हिडीओ चित्रणाच्या मदतीने आरोपींची धरपकड सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अंजर शहा, गुलाब शहा, आवेज शहा, तौफिक शहा, अफरोज शहा, इम्रान शहा, अमीर पठाण, सोहेल शेख, आदम शहा, इकमान शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी उशिरा त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. निरीक्षक देशमुख हे तपास करत आहेत.
Web Title: stone pelting on police Ten people were arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study